समोसेमे आलू , बिहारमे लालू ?

                           समोसेमे आलू , बिहारमे लालू ?

श्रीनिवास भोंग 

एकेकाळी बिमारू म्हणून हिणवल्या जाणाऱ्या बिहारचा अलीकडे असा उल्लेख होंत नाही .एकूणच उत्तर भारताचा उल्लेख आता असा होताना दिसत नाही ही चांगली बाब आहे .उत्तर भारतात सध्या उत्तर प्रदेश , उत्तराखंड , हरयाणा , हिमाचल प्रदेश ,मध्य प्रदेश मध्ये भाजपची सत्ता आहे . बिहार पूर्वी निवडणूक झालेल्या आणि बिहार लगत असलेल्या झारखंड मध्ये भाजपने सत्ता गमावलेली आहे . नुसती सत्ता गमावली नाही तर भाजपचे उमेदवार व मुख्यमंत्री रघुवर दास हे स्वत्त: निवडनुकीत पराभूत झाले .राजस्थान , छत्तीसगड मध्ये भाजपचा पराभव झालेला आहे . या पृष्ट्भुमीवर बिहार निवडणूकीकडे पहिले पाहिजे .

बऱ्याच अर्थानी या बिहार निवडणुकीत महाराष्ट्राचा संबंध आहे . बिहार निवडणुकीत भाजपची धुरा फडणवीस यांचेकडे सोपवण्यात आली आहे . या निवडणुकीत भाजपला चांगल्या जागा मिळाल्यात्यांची बढती होऊ शकते . बिहार मध्ये राष्ट्रवादी कॉंगेसचेही अस्तित्व आहे .तारिक अन्वर आता कॉंग्रेस मध्ये असले तरी बिहार मध्ये त्यांनी दीर्घकाळ पवारसाहेबाना साथ दिली आहे . बिहारमध्ये राष्टवादीचे आमदार खासदार यापूर्वी निवडून आले आहेत. कॉंग्रेसची स्थिती महाराष्टाइतकी चांगली नसली तरी कॉंग्रेसचे अस्तित्व अद्याप टिकून आहे . अर्थात उलट होऊ नये , महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्टवादीच्या संभाव्य पक्ष विस्तारात महाराष्ट्रात कॉंग्रेसची अवस्था बिहार कॉंग्रेस सारखी होऊ नये म्हणजे मिळवली .

कोणताही पक्ष आपल्याला आवडो अथवा न आवडो त्या पक्षाची निवडणुकीतील कामगिरी लक्षात घेतली पाहिजे . मागच्या तीन निवडणुकीत बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाने किमान १८ % मते मिळवली आहेत आणि किमान २२ ते कमाल ८० जागा जिंकल्या आहेत .तर नितीश कुमार यांनी सरासरी १९ ते २० % मते मिळवत किमान ८८ ते कमाल ११५ जागा मिळवल्या आहेत . म्हणजे सरासरी दीड टक्क्याचा दोन्ही पक्षात फरक आहे. महाराष्ट्रातून बिहारमध्ये परत गेलेला मतदार आणी लालू राजवट न पाहिलेला आणी शिक्षण , नोकरीची अपेक्षा करणारा युवा मतदार या दीड टक्क्यात काय फरक आणतात ते पाहायचे .

टिप्पण्या